वेंगुर्ला पतंग महोत्सव : नवाबाग बीच पतंगानी फुलला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 06:40 PM2018-02-11T18:40:49+5:302018-02-11T18:48:49+5:30
वेंगुर्ले नवाबाग किनायावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सावंतवाडी : वेंगुर्ले नवाबाग किनायावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे येथील नवाबाग किनायावर दोन दिवसांच्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी वन इंडिया काईट टीम केरळच्या सदस्यांनी पतंगबाजीचा सराव व प्रात्यक्षिके सादर केली. यानिमित्ताने या महोत्सवात शनिवारी सायंकाळी आंतरवाडा रस्सीखेच स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नवाबाग संघ व सातेरी व्यायामशाळा यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत नवाबाग संघाने विजय मिळविला.नवाबाग संघाला यावेळी पारितोषिक वितरीत करण्यात आले. याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमाचे दाभोली शाळा नं.1 चे लेझीमनृत्य, विश्व डान्स अॅकॅडमीचे क्लासीकल आणि वेस्टर्न डान्स प्रकार, जादूगार वैभव कुमार यांचे जादूचे प्रयोग, जयंत बोवलेकर, नितीन कुलकर्णी, चिन्मयी आसोलकर यांची बहारदार गीते आदींची मेजवानी उपस्थितांनी अनुभवली.
या महोत्सवात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी प्रायोजकांतर्फे मांडवी खाडीतून नवाबाग किनायावर जाण्यासाठी उभारण्यात आलेली तरंगती जेटी नागरिकांसाठी सेल्फी पॉर्इंट बनली होती. त्याचबरोबर वाळू शिल्पकारांनी साकारलेल्या विविध वाळू शिल्पांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. या महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी उभादांडा ग्रा.पं.चे उपसरपंच गणपत केळुसकर, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सामाजिक कार्यकर्ते शरदचंद्र चव्हाण, उद्योजक समीर बटवलकर यांनी महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी माझा वेंगुर्लाचे सदस्य उपस्थीत होते