माती परीक्षणाचे काम स्वाभिमानने रोखले, महामार्ग चौपदरीकरण : कणकवली शहरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 03:46 PM2018-04-18T15:46:25+5:302018-04-18T15:46:25+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी माती परीक्षणाचे काम रोखले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष संदीप मेस्त्री, महेश बागवे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, सचिन पारधिये आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावले
महामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीतील अनेक व्यापारी, नागरिक बाधित झाले आहेत. या सर्वानी अनेकवेळा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी प्रकल्प बाधितांच्या बाजूने उभे रहाण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे.
तसेच जोपर्यंत या बाधितांना योग्य मोबदला मिळत नाही तसेच त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु करु देणार नसल्याचेही प्रशासनाला ठणकावून सांगितले होते.