सेल्फी काढण्याच्या नादात तरुण पडला खोल दरीत, आंबोली घाटातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 19:00 IST2018-06-06T18:59:14+5:302018-06-06T19:00:45+5:30
वर्षापर्यटनासाठी कोकणातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोली येथे हंगामाच्या सुरुवातीलाच दुर्घटना घडली आहे.

सेल्फी काढण्याच्या नादात तरुण पडला खोल दरीत, आंबोली घाटातील घटना
सिंधुदुर्ग - वर्षापर्यटनासाठी कोकणातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या आंबोली येथे हंगामाच्या सुरुवातीलाच दुर्घटना घडली आहे. आंबोली घाटात सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण पाय घसरून 500 ते 600 फूट खोल दरीत पडला आहे. या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
संपत महाले असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिकमधील सिन्नर येथील रहिवाशी असलेला महाले कुटुबींयांसह गोव्यावरून नाशिक येथे परतत होताय याचदरम्यान आंबोली येथे आला असताना येथील प्रसन्न वातावरण पाहून त्याला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मात्र कड्याशेजारी जाऊन सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत पडला.