Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:55 IST2026-01-21T18:52:20+5:302026-01-21T18:55:24+5:30

Haryana man risky stunts Video: एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. 

Video: Invitation to death! You will break into a sweat after watching the young man's stunts, climbing a 282-foot tall building... | Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून...

Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून...

282 फूट उंच इमारतीच्या छतावर एक तरुण जातो. बाजूला असलेल्या जाळीच्या कठड्यावर उभा राहतो आणि त्यानंतर जे काही स्टंट करतो, ते पाहताना तुम्हालाही दरदरून घाम फुटेल. कोणत्याही सुरक्षेशिवाय तरुण जे काही करतो, ते खूपच धोकादायक आहे. तरुणाच्या या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

हरयाणातील हिसार शहरात ही घटना घडली. हिसार महापालिका कार्यालयापासून जवळच असलेल्या जिंदाल टॉवर इमारतीच्या छतावर तरुणाने ही स्टंटबाजी केली. 

२८२ फूट उंच असलेल्या इमारतीच्या छतावर जाऊन त्याने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता हा सगळा प्रकार केला. रविवारी ही घटना घडली. त्यानंतर त्याच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

तरुणाने आधी काचेच्या तीन बाटल्यांचा आधार घेत स्टंट केला. यावेळी हवेचा वेग इतका होता की, तो हेलकावत होता. त्यानंतर त्याने लोखंडी कठड्याला लटकत आणि स्टंट केले. 

तरुणांची जिंदाल टॉवरवर स्टंटबाजी, व्हिडीओ बघा

बिअर बॉटल घेऊन टॉवरमध्ये शिरला

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिंदाल टॉवरमध्ये सुरक्षा असतानाही तो गुंगारा देऊन आत शिरला. त्याच्याजवळ बिअर बॉटल होत्या. त्या त्याने बॅगेत ठेवलेल्या होत्या. छतावर चौफेर असलेल्या लोखंडी जाळीवर जाऊन त्याने स्टंट केले. 

याची माहिती कर्मचाऱ्यांना कळली. त्यांनी तातडीने छतावर जाऊन त्या तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. टॉवरचे व्यवस्थापक कुलदीप सिंह यांनी सांगितले की, तरुणाने त्याची चूक कबूल केली आहे. त्याने पोलिसांकडे माफीही मागितली आहे. 

अशा प्रकारचे स्टंट आपण पुन्हा करणार नाही, अशी हमी त्याने पोलिसांना दिली असून, पोलिसांनी समुपदेशन करून त्याला सोडून दिले. 

Web Title : मौत को दावत: 282 फीट ऊंचे टॉवर पर खतरनाक स्टंट

Web Summary : हरियाणा में एक युवक ने 282 फीट ऊंचे टॉवर पर बिना सुरक्षा उपकरणों के खतरनाक स्टंट किए। कर्मचारियों ने उसे पकड़ लिया, उसने अपनी गलती स्वीकार की, पुलिस से माफी मांगी और परामर्श के बाद उसे रिहा कर दिया गया। वीडियो वायरल हो गया।

Web Title : Daredevil's Death Wish: Risky Stunts Atop 282-Foot Tower

Web Summary : A young man performed dangerous stunts atop a 282-foot tower in Haryana, India, without safety equipment. He was apprehended by staff, admitted his mistake, apologized to police, and was released after counseling. The video went viral.