सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ‘यलो’ यादीतील शेतकरी ‘रेड’मध्ये, कर्जमाफीसाठी पात्र झाले ३,२२४ शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:27 PM2018-01-30T16:27:27+5:302018-01-30T16:29:42+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.

Farmer's list of farmers' debt in Solapur district was reduced to 3,224 farmers, who were eligible for debt relief. |  सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ‘यलो’ यादीतील शेतकरी ‘रेड’मध्ये, कर्जमाफीसाठी पात्र झाले ३,२२४ शेतकरी

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ‘यलो’ यादीतील शेतकरी ‘रेड’मध्ये, कर्जमाफीसाठी पात्र झाले ३,२२४ शेतकरी

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफीअपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३० : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफी होत आहे. सोलापूर जिल्हा बँकेला ११ हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी आली होती. ती बँकेने तपासणीसाठी विकास सोसायट्यांकडे दिली होती. सोसायट्यांचे सचिव, बँकेच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत ३२२४ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले आहेत. ही पात्र शेतकºयांची यादी शासनाला आॅनलाईन पाठवली असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तपासणीत निकषात न बसणारे ६ हजार ९१६ शेतकरी निघाले आहेत. शासनाने निकष लावल्याने या अपात्र शेतकºयांची नावे कर्जमाफीतून कायमची बाहेर पडली आहेत. शासनाने दिलेल्या निकषानुसार ‘यलो’ यादी तपासणीनंतर हे शेतकरी ‘रेड’ यादीत आले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले असून त्रुटी निघालेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची अचूक यादी शासनाला फेरसादर केली आहे. याशिवाय ४७ हजार ११ शेतकºयांची ‘मिसमॅच’यादी तपासणीसाठी गावपातळीवर पाठवली असून यावर तालुका समिती निर्णय घेणार आहे. 
-------------------
अक्कलकोटचे सर्व शेतकरी पात्र 
- जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलेल्या १० हजार १४० शेतकºयांच्या यादीच्या तपासणीत माढ्याचे ९४७, पंढरपूरचे ५४५, सांगोल्याचे ३२९, करमाळ्याचे ३२०, मोहोळचे २९८, माळशिरसचे २२०, अक्कलकोटचे २१७, दक्षिणचे १८५, मंगळवेढ्याचे ७२, बार्शीचे ३८ व उत्तर तालुक्यातील ५६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. 
- अपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश आहे. अक्कलकोटचा एकही शेतकरी अपात्र ठरला नाही. 

Web Title: Farmer's list of farmers' debt in Solapur district was reduced to 3,224 farmers, who were eligible for debt relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.