टाटांच्या धरणांविरुद्ध एकजुटीने लढा द्या! - एन. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 05:27 AM2018-05-06T05:27:45+5:302018-05-06T05:27:45+5:30
वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.
सोलापूर - वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.
पाणी चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांच्या ‘हे पाणी आमचं’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथे झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते. खासदार कुमार केतकर, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी या वेळी मंचावर उपस्थित होते.
एन. डी. पाटील म्हणाले, कृष्णा खोºयाचाच भाग असलेल्या भीमा उर्ध्व खोºयातील पाणी अडवून टाटाने पश्चिमेकडे वळविले. आता आपणाला खोºयातील नदीच्या पाण्याला त्याची नैसर्गिक पूर्व दिशा मिळवून द्यायची आहे.
केतकर म्हणाले, निसर्गातील कोणतीही गोष्ट कुणाच्याही मालकीची असू नये, ही गांधीजींची भूमिका होती. विनोबा भावे यांनीही हीच भूमिका होती. भीमा उर्ध्व खोºयातील पाणी हे तेथील शेतकºयांच्या हक्काचे आहे. ते त्यांना मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी टाटांच्या धरणांचा प्रश्न सामोपचार आणि घटनेच्या आधाराने सोडविण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार गणपतराव देशमुख यांचेही भाषण झाले.