गणेश मंडळांनी रचनात्मक उपक्रमावर भर द्यावा, विश्वास नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:22 PM2018-09-11T16:22:59+5:302018-09-11T16:25:59+5:30
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़
सोलापूर : यंदाच्या वर्षी मोहरम व गणपती उत्सव एकत्र आले आहेत़ या उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत मंडळांनी रचनात्मक, सामाजिक उपक्रमावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले़
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ यावेळी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते़ गणेशोत्सव, मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेतली़ गणेशोत्सव व मोहरम सणात पोलीसांनी काय काय उपाययोजना कराव्यात, पोलीस बंदोबस्त आदी बाबींचा आढावा विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला़ ही आढावा बैठक सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयातील सभागृहात झाली.
पुढे बोलताना विश्वास नांगरे-पाटील म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करीत असताना मंडळांनी रितसर पोलीसांची परवानगी घेणे आवश्यक आहे़ डीजे न लावता पारंपारिक वाद्याचा वापर करून मिरवणुका काढाव्यात, गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक तसेच रचनात्मक उपक्रमावर भर देण्याचे आवाहन केले़ . राज्यात १ लाख ५० हजारांहुन अधिक गणेश मंडळे आहेत़ प्रत्येक वर्षी या मंडळांकडून १५ कोटी पेक्षा जास्त रकमेची वर्गणी गोळा केली जाते़ हा पैसा विधायक कामासाठी लागल्यास समाजाला नवी दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही नांगरे-पाटील यांनी सांगितले़