पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही, सहकार व पणन मंत्र्याचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:43 PM2018-05-16T13:43:40+5:302018-05-16T13:43:40+5:30

सरकारचा संबंध नाही, संबंधित ‘त्या’ व्यापाºयांवर कारवाई करणार

The government does not know about imported sugar from Pakistan, explanation of the minister of cooperation and marketing | पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही, सहकार व पणन मंत्र्याचे स्पष्टीकरण 

पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही, सहकार व पणन मंत्र्याचे स्पष्टीकरण 

Next
ठळक मुद्देसाखर कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्याचा विचारदेशातील उसाचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढलेनैसर्गिक स्थिती अनुकूल असल्याने साखर उताºयातही वाढ

सोलापूर : पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला माहिती नाही. व्यापाºयाने बेकायदेशीरपणे ही साखर आयात केली असावी. त्या व्यापाºयाची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याचा इशारा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, साखरेवरील आयातशुल्क वाढविल्यामुळे ती आयात करणे कोणालाच परवडणारे नाही. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळात देशात साखर आयात केलेली नाही. 

गतवर्षी साखरेचा प्रतिटन दर ३ हजार ५०० रुपये असताना उसाची एफआरपी जाहीर करण्यात आली. आज ही साखर २ हजार ५०० रुपये प्रतिटन दराने विकली जाते. त्यामुळे साखर कारखानेदेखील अडचणीत आल्याची कबुली सहकारमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारने निर्यात साखरेवर ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे; मात्र ही रक्कम पुरेशी नाही. साखरेच्या दरावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार आहे. आठवडाभरात ही भेट होईल आणि त्यावर निश्चित तोडगा निघेल, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी दिली.

साखर उताºयात वाढ
यंदा अनपेक्षितपणे देशातील उसाचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर नैसर्गिक स्थिती अनुकूल असल्याने साखर उताºयातही वाढ झाली. 


आॅक्टोबरमध्येच कारखाने सुरु करणार
आगामी गळीत हंगामात साखर कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्याचा विचार आहे. हंगामातील पहिले दोन महिने कच्ची साखर उत्पादित करून ती निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. इथेनॉल निर्मितीसाठी उत्सुक असलेल्या कारखान्यांना परवाने दिले जातील. त्यामुळे साखर उत्पादन घटण्यास मदत होऊन उपपदार्थनिर्मिती वाढेल, असे सहकारमंत्री म्हणाले. 

Web Title: The government does not know about imported sugar from Pakistan, explanation of the minister of cooperation and marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.