जरांगे औषध घेणार नसतील, तर मलाही नको.. बार्शीतही आरक्षणासाठी आमरण उपोषण!
By रवींद्र देशमुख | Published: February 13, 2024 06:19 PM2024-02-13T18:19:06+5:302024-02-13T18:19:27+5:30
आनंद काशीद यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस
रवींद्र देशमुख, बार्शी: सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे अंमलबजानी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून बार्शी येथे तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद या कार्यकर्त्याने गेल्या तीन दिवसांपासून अमरण उपोषण करुन लक्ष वेधून घेतले आहे.
मंगळवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. काशीद यांनी औषधोपचार व डॉक्टर तपासणी करण्यास नकार दिला. मनोज जरांगे पाटील जर औषध उपचार घेत नसतील किंवा तपासून घेत नसतील तर आम्ही देखील उपचार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्याने यावेळी घेतली.