पवारांनी काँग्रेस सोडली नसती तर ते पंतप्रधान झाले असते - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 05:11 AM2018-02-08T05:11:44+5:302018-02-08T05:12:21+5:30
शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
सोलापूर : शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
वार्तालाप कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी शरद पवारांचे गुणगाण गायले. ते म्हणाले, पवारांना मी गुरुस्थानी मानतो. ते अतिशय चलाख व शार्प आहेत. त्यांना सर्वांत अगोदर वाºयाची दिशा कळते. पण पवार जेव्हा नाही-नाही म्हणतात, तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण खूप जवळून पहिले आहे. मुख्यमंत्री आणि हिमाचलचे प्रभारी असताना आम्ही भेटायचो. मात्र मोदी हे चहा विकत होते असे माझ्या कधीच ऐकण्यात आले नाही. ते आत्ताच चहावाले झाले असावेत. किमान चहावाल्यांसाठी तरी त्यांनी काही करावे, असा टोला शिंदे यांनी लगावला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर त्याचा काँग्रेसला फायदा होईल. मात्र मतदान मतपत्रिकेवर झाले पाहिजे़ नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रात जादू केली आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.