मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतील थकबाकीदार शेतकºयांना वीज देयके नवीन स्वरूपात मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:24 PM2017-11-07T17:24:33+5:302017-11-07T17:24:44+5:30
राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : राज्यातील कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.
योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतकºयांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या शिवाय चौकटीत जून-२०१७ चे देयक या अगोदर वितरित करण्यात आले असून, हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येत आहे, असे नमुद केले आहे.
या देयकात महावितरणकडून ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी असणाºया ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाºया शेतकºयांना १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत, याची सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच थकबाकीचे हफ्ते नियमित भरणाºया शेतकºयांना नेमका किती रुपयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल, याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे. थकबाकीदार शेतकºयांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त व्हावे आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.