थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:53 PM2017-12-28T12:53:12+5:302017-12-28T12:55:30+5:30

गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्टचा एन्जॉय मनाप्रमाणे करता आलेला नाही. मद्यपींना आपल्या मोहाला आवर घालावा लागला होता; मात्र यावर्षी इयरएंड साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणाºया उत्साही जणांना उत्पादन शुल्क खात्याकडून खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला देण्यात आलेला आहे.

Thirtyfirst ...! Drink plenty ... but keep alcohol near license, allotment of 1.5 lakh licenses from Solapur's excise department | थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप

थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप

Next
ठळक मुद्देएक आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपानाचे परवाने आॅनलाईनकायमस्वरूपी, वार्षिक आणि एकदिवसीय असे परवाने थेट मिळत असल्यामुळे मद्यप्रेमींना कार्यालयात येण्याची गरज नाही खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला


महेश कुलकर्णी 
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्टचा एन्जॉय मनाप्रमाणे करता आलेला नाही. मद्यपींना आपल्या मोहाला आवर घालावा लागला होता; मात्र यावर्षी इयरएंड साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणाºया उत्साही जणांना उत्पादन शुल्क खात्याकडून खुशाल प्या पण एक दिवसीय परवाना जवळ बाळगा असा  प्रेमळ कायदेशीर सल्ला देण्यात आलेला आहे.
राज्यभरात दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करणाºयांची संख्या लक्षणीय आहे. राज्य शासनाच्या वतीने ख्रिसमसपासून तीन दिवस रात्री उशिरापर्यंत वाईन शॉप आणि परमिट रुम सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देशी मद्यसेवनाचे एक लाख परवाने विविध मद्यविक्री दुकानांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. तसेच देशी मद्यसेवनाचे ५४,३०० परवाने वाटप करण्यात आले आहेत. मद्यपींनी थर्टीफर्स्ट जोरदार साजरा करावा, परंतु शासनाच्या नियमानुसार एक दिवसीय परवाना काढावा, असे आवाहन उत्पादन शुल्क खात्याकडून करण्यात आले आहे. एक वाईनशॉपमध्ये एक हजार मद्यसेवन परवाने ठेवण्यात आलेले आहेत. तसेच देशी दारूचे दुकान आणि परमिट रुममध्ये एक लाख परवाने ठेवले आहेत. एका परवान्याची किंमत पाच रुपये आहे.शहर आणि जिल्ह्यात एकूण ८४६ मद्यविक्रींची दुकाने आहेत. या सर्व दुकानांतून थर्टीफर्स्टच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यविक्री होते. पहाटेपर्यंत सुरू राहणाºया बारमध्ये होणाºया मद्यविक्रीतून शासनाला अधिकाधिक महसूल मिळण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून उत्पादन शुल्क खात्याकडून बनावट आणि बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मद्यावर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात चार ठिकाणी छापे मारून बनावट मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने देण्यात आली. 
-------------------------
आॅनलाईनमुळे सोय !
एक आॅगस्टपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याने मद्यपानाचे परवाने आॅनलाईन केल्यामुळे यावर्षी उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयातील कामाचा व्याप कमी झाला आहे. कायमस्वरूपी, वार्षिक आणि एकदिवसीय असे परवाने थेट मिळत असल्यामुळे मद्यप्रेमींना कार्यालयात येण्याची गरज नाही.
---------------------------
शहर-जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने
परमिट बार             - ४००
बीअर शॉपी        - ३००
देशी दारू दुकाने - १२४
वाईन शॉप            -  ४०
मद्यसेवन परवाने
कायमस्वरूपी     - ७७,५३२
वार्षिक              - ३८,८९४
एक दिवसीय देशी                           -१,००,०००
विदेशी            -    ५४,३००
-------------------------
सरत्या वर्षाला निरोप अन् येणाºया नव्या २०१८ सालाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परमिट रुम-बीअर बार, बीअर शॉपी खुली असली तरी मद्यप्रेमींनी परमिट (पिण्याचे लायसन) घेतल्याशिवाय मद्यपान करू नये.
रवींद्र आवळे
अधीक्षक राज्य
 उत्पादन शुल्क विभाग

Web Title: Thirtyfirst ...! Drink plenty ... but keep alcohol near license, allotment of 1.5 lakh licenses from Solapur's excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.