महिलांचे झांज पथक रवाना
By admin | Published: January 12, 2015 01:13 PM2015-01-12T13:13:17+5:302015-01-12T13:23:44+5:30
राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी ४५ महिलांचे झांज पथक सिंदखेड राजाकडे रवाना झाले.
सोलापूर: राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी ४५ महिलांचे झांज पथक सिंदखेड राजाकडे रवाना झाले.
यामध्ये जिजाऊ महिला अध्यक्षा मनीषा नलावडे, लता ढेरे, शुभांगी गोडसे,शुभांगी निंबाळकर, उज्ज्वला ढवले, रंजना सावंत आदी महिलांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राम गायकवाड, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुखदेव नलावडे, श्याम ढवळे, प्रतिभा साठे, मंगल कोल्हे, ऊर्मिला पाटील, सुनंदा साळुंखे, सुनीता गरड, मृणाल पवार,राधा पवार, आशा भोसले यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
राजमाता जिजाऊ मध्यवर्ती मंडळाच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी दुपारी जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी राजे पुतळ्यापासून जिजाऊ मातेची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक संभाजी राजे चौक, शिवाजी महाराज चौक, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, चार पुतळा चौक, पार्क चौक या मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी मनोज शिंदे, अजय शिंदे, स्वप्निल माने, अमोल गरड, प्रवीण शेळवणे, राजू दिंडोरे, दिनेश घाडगे, सागर मोरे, किशोर मोरे, बालाजी जाधव, चंदन घुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)