आमिर माझा चांगला मित्र, पण त्याने देशवासियांना दुखावलं - व्यंकय्या नायडू
By admin | Published: January 30, 2016 12:30 PM2016-01-30T12:30:40+5:302016-01-30T12:31:37+5:30
आमिर खान माझा चांगला मित्र आहे, पण देशातील असहिष्णूतेबाबत त्याने जे वक्तव्य केले त्यामुळे माझ्या आणि सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या असे व्यंकय्या नायडू यांनी म्हटले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - आमिर खान माझा चांगला मित्र आहे, पण देशातील असहिष्णूतेबाबत त्याने जे वक्तव्य केले त्यामुळे माझ्या आणि सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या असे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले. पुण्याच्या एमआयटी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नायडू यांना असहिष्णूतेसंदर्भात आमीर खानने याने केलेल्या विधानाबद्दल त्यांचे मत विचारले असता त्यांनी आपल्याला आमिरचे विधान पटले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच असहिष्णुतेच्या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधानांना न स्वीकारणे हीच मोठी असहिष्णुता असल्याची टीका त्यांनी केली.
देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवले होते, असे वक्तव्य आमिरने गेल्या वर्षी दिल्लीतील एका कार्यक्रमात केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली, अनेकांनी त्याला देश सोडून जायचा सल्लाही दिला होता. त्यानंतर त्याला ' अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून काढण्यात आले तसेच त्याची सुरक्षाही कमी करण्यात आली.