भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By admin | Published: February 22, 2016 03:51 PM2016-02-22T15:51:21+5:302016-02-22T15:51:21+5:30

शनिशिंगणापुरच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश द्या अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Police arrested Tripti Desai of Bhumata Brigade | भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next
>ऑनलाइन लोकमत - 
अहमदनगर, दि. 20 - शनिशिंगणापुरच्या चौथ-यावर महिलांना  प्रवेश  द्या अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिशिंगणापूरमध्ये शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई गावक-यांशी आणि विश्वस्तांशी चर्चा करण्यासाठी जात होत्या. पोलिसांनी रस्त्यातच त्यांना अडवून ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई यांच्यासोबत भुमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी तसंच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा शहनाज शेख देखील उपस्थित होत्या. विश्वस्त आणि गावक-यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार होती. मात्र त्याअगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Police arrested Tripti Desai of Bhumata Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.