६३ तासांनी संजय दत्त तुरूंगातून बाहेर

By admin | Published: February 22, 2016 07:10 PM2016-02-22T19:10:02+5:302016-02-22T19:10:02+5:30

मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार आहे.

63 hours out of jail Sanjay Dutt | ६३ तासांनी संजय दत्त तुरूंगातून बाहेर

६३ तासांनी संजय दत्त तुरूंगातून बाहेर

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार आहे. २५ तारखेला सकाळी १० ते १०:३० वाजता त्याला सोडले जाणार आहे. त्याच्या सुटकेला आता फक्त ६३ तासच बाकी आहेत.  त्याच्या चाहत्यामध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले असेल.
 
गृहमंत्रालयाने संजयच्या सुटकेला हिरवा कंदील दाखवल्यामुळे तो १०७ दिवस आधीच तुरुंगातून सुटणार आहे. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची तुरुंगातून लवकर सुटका होणार असल्याचे समजते आहे. 
 
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र या खटल्याचे कामकाज सुरू असताना त्याने १८ महिने तुरूंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांचा कालावधी तुरूंगाता काढावा लागणार होता. मे २०१३ मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. अखेर आता २५ फेब्रुवारी रोजी त्याची तुरूंगातून सुटका होणार आहे. 

Web Title: 63 hours out of jail Sanjay Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.