भरवस्तीत विमानचे इमर्जन्सी लँडिंग

By admin | Published: March 10, 2016 01:18 AM2016-03-10T01:18:14+5:302016-03-10T01:18:14+5:30

येथील ग्लायडिंग सेंटरमधील एक ग्लायडर (विमान) हवेतील कमी दाबामुळे गोंधळेनगर येथील मोकळ्या जागेत तत्काळ उतरवावे लागले. ६५ वर्षीय ग्लायडर पायलटने दाखविलेल्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Emergency landing in full-time aircraft | भरवस्तीत विमानचे इमर्जन्सी लँडिंग

भरवस्तीत विमानचे इमर्जन्सी लँडिंग

Next

हडपसर : येथील ग्लायडिंग सेंटरमधील एक ग्लायडर (विमान) हवेतील कमी दाबामुळे गोंधळेनगर येथील मोकळ्या जागेत तत्काळ उतरवावे लागले. ६५ वर्षीय ग्लायडर पायलटने दाखविलेल्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पायलट किरकोळ जखमी झाला आहे. ग्लायडिंग सेंटरशेजारीच गोंधळेनगर येथे मोठी लोकवस्ती आहे. याच भागातील कालव्यालगतच्या मोकळ्या जागेत हे ग्लायडर लँडिंंग करण्यात आले.
लक्ष्मण दत्तात्रय कोकाटे ( वय ६५, रा. विमाननगर, पुणे) हे ग्लायडर पायलट डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीतळ येथील ग्लायडिंग सेंटर येथून दुपारी दोनच्या सुमारास ग्लायडर (विमान) घेऊन पायलट कोकाटे यांनी उड्डाण केले होते. अर्धा तास हवेत सराव सुरू होता.
सराव सुरू असताना हवेतील कमी दाबामुळे विमानात बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्या वेळी सातववाडी या मोठी लोकवस्ती असलेल्या वस्तीवर ग्लायडर होते. त्यामुळे मोठा धोका होता. वेळीच प्रसंगावधान आणि धाडस दाखवून पायलट कोकाटे यांनी येथील पालिकेच्या शहीद करकरे उद्यानाशेजारी कालव्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तीनच्या सुमारास हे विमान खाली घेत असताना येथील हायटेन्शन वीजतारेला धडकून तार तुटली, तर मोकळ्या जागेत असलेल्या लोखंडी पाईपवर ते आदळले. विमान पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली तशी परिसरात बघ्यांनी गर्दी केली. पोलीस आल्यानंतर येथील गर्दीला बाजूला करून विमानाचे भाग सुटे करून विमान हलविण्यात आले. (वार्ताहर)ग्लायडिंग सेंटरचे प्रमुख कॅप्टन चारभे म्हणाले, की हे ग्लायडर हवेवर चालते. हवेत अचानक बदल झाल्यास असे इमर्जन्सी लँडिंग करावे लागते. तसेच, पायलटने योग्य निर्णय घेऊन लोकवस्तीपासून दुरू नेऊन मोकळ्या जागेत लँडिंग
केले.

Web Title: Emergency landing in full-time aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.