डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात

By admin | Published: March 23, 2016 12:10 PM2016-03-23T12:10:15+5:302016-03-23T12:10:31+5:30

मुंबई 26/11 दहशतवादी हल्याचा माफीचा साक्षीदार बनलेला लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे

Beginning of cross-examination by David Headley | डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात

डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात

Next
>
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २३ - मुंबई 26/11 दहशतवादी हल्याचा माफीचा साक्षीदार बनलेला लष्कर-ए-तोयबाचा अमेरिकन-पाकिस्तानी डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. बुधवारी उलटतपासणीदरम्यान डेव्हिड हेडलीला पत्नी शाजिया गिलानी आणि तहव्वूर राणा यांच्या सहभागाविषयी प्रश्न विचारण्यात आले. खटल्यातील आरोपी अबू जुंदालचे वकील डेव्हिड हेडलीची उलटतपासणी करत आहेत.ही उलटतपासणी २३ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे. 
 
हेडलीच्या उलटतपासणीस २२ मार्चपासून सुरुवात होणार होती, परंतु त्याचे वकील आजारी पडल्याने त्याची उलटतपासणी पुढे ढकलण्यात आली. पत्नी शाजिया गिलानीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर 'माझ्याबद्दल प्रश्न विचारा माझ्या बायकोबद्दल नाही' म्हणत डेव्हिड हेडलीने उत्तर देण्यास नकार दिला. मात्र आपल्या पत्नीला आपल्या लष्कर-ए-तोयबामधील सहभागाविषयी माहिती असल्याचं त्याने सांगितलं आहे. 
 
तसंच तहव्वूर राणा यालादेखील मी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याची माहिती होती मात्र  तहव्वूर राणा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हता अशी माहिती हेडलीने न्यायालयात दिली आहे. तहव्वूर राणाने हेडलीला 26/11 हल्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. तहव्वूर राणा सध्या अमेरिकेतील जेलमध्ये असून 26/11 हल्ला प्रकरणी त्याच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत.  
याअगोदर डेव्हिड कोलमन हेडली याची पत्नी शाजिया आणि त्याचा मित्र डॉ. तहव्वूर राणा यांनाही या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात यावे, अशी मागणी खटल्यातील आरोपी अबू जुंदाल याने विशेष न्यायालयाकडे केली होती. या दोघांनाही हल्ल्याची माहिती होती, असा दावा जुंदालकडून ही मागणी करताना करण्यात आला होता. 
 

Web Title: Beginning of cross-examination by David Headley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.