देवनार कचरा डेपो आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेते अटकेत
By admin | Published: April 17, 2016 08:57 AM2016-04-17T08:57:22+5:302016-04-17T08:57:22+5:30
देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आलं आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७- देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आलं आहे. याआधी पोलिसांनी 9 भंगार विक्रेत्यांना अटक केली होती. कुर्ला कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली आहे. आता आगप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक केल्यानं त्यांची संख्या 13 झाली आहे.
भंगारातल्या वस्तू वेगवेगळ्या करण्यासाठी ही आग लावण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी जवळपास देवनार डंपिंग ग्राऊंड परिसरातील 25 ते 30 भंगार गोळा करणा-या मुला-मुलींसहीत भंगार विक्रेत्यांची चौकशी केली होती.
या चौकशीतून भंगार विक्रेत्यांच्या सांगण्यावरून या आगी लावण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं आहे. भंगार वस्तूमधील धातू वेगळं करण्यासाठी भंगार विक्रेते मुलांना कचरा डेपोत पाठवत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.