पीटर मुखर्जीचं इंद्राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र

By admin | Published: May 4, 2016 08:32 AM2016-05-04T08:32:40+5:302016-05-04T08:32:40+5:30

शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीने आपली पत्नी इंद्राणी मुखर्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार पत्र पाठवलं आहे

Peter Mukerjee's Happy Birthday Letter to Indrani | पीटर मुखर्जीचं इंद्राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र

पीटर मुखर्जीचं इंद्राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 04 - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीने आपली पत्नी इंद्राणी मुखर्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं आहे. जानेवारी महिन्यात हे पत्र पाठवण्यात आलं होतं. शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून सध्या पीटर आणि इंद्राणी दोघेही अटकेत असून कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अटकेनंतर दोघांनी एकमेकांवर आरोप केले होते. मात्र या पत्रामुळे दोघांमधील स्नेहसंबंध अजूनही टिकून असल्याचं दिसत आहे. 
 
पीटर मुखर्जीने 3 जानेवारीला हे पत्र पाठवलं आहे. पीटर मुखर्जीने हे पत्र स्वत: लिहिलं आहे. पीटरच्या या पत्रामुळे आश्चर्यदेखील व्यक्त केलं जात आहे. पीटर मुखर्जीने सुरुवातीपासून आपल्या या हत्या प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे. पीटरने जामिनासाठी याचिका केली असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
 
'तुझी निर्दोषतता सिद्ध व्हावी आणि या भयानक अनुभवातून बाहेर पडावीस अशी प्रार्थना करेन', असं पीटरने पत्रात म्हटलं आहे. हत्येप्रकरणी इंद्राणी आणि आपल्यावर सुरु असलेल्या ट्रायलचा दाखला देत पीटरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयात मात्र दोघेही फार कमी वेळा एकमेकांशी बोलताना दिसतात. गेल्याच महिन्यात दोघांनी एकमेकांसोबत मिठाई खाल्ली होती. 
'आज तुझ्या आणि माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. जेव्हापासून आपण भेटलो तेव्हापासून तुझा वाढदिवस आपण एकत्रच साजरा केला, पण पहिल्यांदाच आपण इतके जवळ असूनही लांब आहोत', असं म्हणत पीटर मुखर्जीने आपल्या एक पानाच्या पत्रात जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 
 
'देव महान आहे आणि याचा शेवट नक्की होईल. घरी नाहीतर न्यायालयात रोमिओ - जुलिअटप्रमाणे आपण एकमेकांना पुन्हा भेटू शकू. हे पत्र तुझ्यापर्यत पोहचेल आणि या दुख:द वेळी तुला एक आनंदी क्षण देईल अशी आशा करतो', असंही पीटरने लिहिलं आहे. 
 

Web Title: Peter Mukerjee's Happy Birthday Letter to Indrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.