पुण्याच्या विमानतळासाठी 15 एकर जमीन देणार - मनोहर पर्रीकर
By admin | Published: May 15, 2016 05:36 PM2016-05-15T17:36:38+5:302016-05-15T17:36:38+5:30
पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देन्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ : पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देन्याचा निर्णय घेण्यात आला असून विमानतळाबाहेरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक परवानग्या 31 मे पर्यंत देण्यात येतील अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्या 30 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या पुण्यामधून 55 लाख प्रवासी 66 शेड्युल्ड विमानांद्वारे प्रवास करतात. विमानतळ आणि हवाई दलाच्या सुरक्षेचा विचार करता एका निश्चित वेळेत विस्तारीकरणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. फेज 2 साठी पुढील 3 महिन्यात निर्णय घेऊन विस्तारीकरणाला सुरुवात करण्यात येईल. तर फेज एकमध्ये सध्याच्या विमानतळाच्या जागेत 30 ते 40 टक्क्यांची वाढ करणार आहोत. त्यासाठी 15. 84 एकर जमीन हवाई दल एअरपोर्ट एथोरिटीला भाड्याने देणार आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणा दरम्यान भूमिगत केबल आणि पाईपलाईन हलवण्याचे काम करावे लागणार आहे. सुरक्षेचा विचार करून हवाई दल, एअरपोर्ट एथोरिटी यांच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक उपस्थित होते