डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचा लागला शोध? CBIचे पुणे, पनवेलमध्ये छापे

By Admin | Published: June 1, 2016 03:30 PM2016-06-01T15:30:41+5:302016-06-01T18:38:26+5:30

डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली असा दावा आशिष खेतान यांनी केला.

Dr. Dabholkar murder killer started? CBI raids in Pune, Panvel | डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचा लागला शोध? CBIचे पुणे, पनवेलमध्ये छापे

डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचा लागला शोध? CBIचे पुणे, पनवेलमध्ये छापे

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १ - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा आम आदमी पक्षाचे (आप) आशिष खेतान यांनी बुधवारी केला. 'डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली आहे' असा दावा खेतान यांनी आज ट्विटरवरून केला आहे. दरम्यान डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज पुणे व पनवेलमध्ये छापे मारले आहेत. पुण्यात सारंग अकोलकर व डॉ.वीरेंद्रसिंग तावडे यांच्या पनवेलमधील घरी सीबीआयने छापे मारले. हे दोघेही सनातन संस्थेचे साधक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या छाप्यांद्वारे नेमकी काय माहिती सीबीआयच्या हाती लागली आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. 
' राजकारणातील उजव्या घटकांचा समावेश असलेल्या कॉंग्रेस पक्षाने दाभोलकर प्रकरणाची क्रूर चेष्टा केली,' अशी टीका खेतान यांनी ट्विटरवरून केली. 'तसेच सनातन संस्थेने गोवा व महाराष्ट्रामध्ये काही बॉंबस्फोट घडविल्याचा आरोपही त्यांनी केला. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी सुरक्षा संस्था प्रयत्न करत होत्या, त्यांनी तशी मागणीही केली होती. मात्र कॉंग्रेस सरकारने त्यावर कोणतीही कृती केली नाही' असा हल्ला खेतान यांनी चढविला. ' दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरक्षा दलांनी पूर्ण केला असून या हत्येमध्ये सनातन संस्थेचे साधक व हिंदु जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांचा हात होता असेही खेतान यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Dr. Dabholkar murder killer started? CBI raids in Pune, Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.