विदर्भाच्या वाटेने मान्सून पोहोचला महाराष्ट्रात
By admin | Published: June 18, 2016 03:35 PM2016-06-18T15:35:35+5:302016-06-18T15:45:30+5:30
गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी ही माहिती दिली आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून सक्रीय होणार असून, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात मान्सूनतेच्या सक्रीयतेसाठी अनुकूल वातावरण आहे. बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. बिहार, ओदिशा, पश्चिबंगाल, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक आणि केरळमध्ये भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
केरळ आणि लक्षव्दीपमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उखडली गेली तसेच काही घरांचे नुकसान झाले. मान्सून अपेक्षित अंदाजापेक्षा आठवडभर उशिराने आठ जूनला केरळमध्ये दाखल झाला होता. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनच्या सक्रीयतेला अनुकूल वातावरण आहे.