शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

By admin | Published: June 24, 2016 08:49 AM2016-06-24T08:49:03+5:302016-06-24T08:55:34+5:30

‘ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?’ हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला आहे

Shiv Sena should not teach wisdom, Uddhav Thackeray targets BJP | शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

शिवसेनेला शहाणपण शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 24 - डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत. अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ‘ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?’ हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली व स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे  भाजपाच्या ‘मनोगत’ पाक्षिकातून करण्यात आलेल्या टीकेला उद्धव ठाकरे सामनातून उत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सुब्रमण्यम स्वामी आणि अरुण जेटलींचं नाव घेत भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
काही दिवसांपुर्वी सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे काँग्रेसधार्मिणे असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेटलींनी अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
भाजपाने काय केली होती टीका ? (उद्धव तर शोलेतील असरानी)           
 
शिवसेना महाराष्ट्रात व केंद्रातील सत्तेत असतानाही सरकारविरोधात भूमिका घेत असल्याची टीका होत असते व हे असे वागणे शिवसेनेला शोभते काय? असे प्रश्‍न भाजप मित्रवर्यांकडून विचारले जातात तेव्हा विनोदबुद्धीस टाळी देण्याचा मोह आवरत नाही. आपण सत्तेत आहोत याचे भान ठेवा असे सल्लेही दिले जातात; पण सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जो आर्थिक कलगीतुरा रंगला आहे त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचे आम्ही आजच जाहीर करीत आहोत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात, सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात, त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे डॉ. स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्याबाबतीत म्हटले आहे व ते गंभीर आहे; पण स्वामी यांची विधाने अर्थमंत्री जेटली यांनी उडवून लावली आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांना हटवले जाणार नाही व ते मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी मांडली आहे. वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीही स्वामी यांना विरोध करून अरविंद सुब्रमण्यम यांची बाजू घेतली आहे. जेटली व डॉ. स्वामी हे एकाच पक्षाचे आहेत व दोघांतील वादामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
स्वामी, जेटली, रघुराम व अरविंद सुब्रमण्यम यांच्यातील पिपाण्या व रणशिंगे म्हणजे भाजपातील अंतर्गत कलह असावेत. देशाची अंतर्गत सुरक्षा, पाकिस्तान, कश्मीरच्या प्रश्‍नांवर शिवसेना राष्ट्रहितासाठी म्हणून भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे स्वपक्षातील कलगीतुर्‍यांवर ‘मौन’ धारण करतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपामधील अंतर्गत कलहावर टीका केली आहे.
 

Web Title: Shiv Sena should not teach wisdom, Uddhav Thackeray targets BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.