विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

By admin | Published: August 3, 2016 07:01 PM2016-08-03T19:01:20+5:302016-08-03T19:47:40+5:30

लोकशाही टिकवण्यासठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे

The House is closed for consideration - Jayant Patil | विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

विचार करण्यासाठी सभागृहाचं कामकाज बंद केलं जातं - जयंत पाटील

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 -  लोकशाही टिकवण्यासाठी सभागृहाचं कामकाज सुरु असतं, तर विचार करण्यासाठी कामकाज बंद केलं जातं असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी जयंत पाटील यांनी प्रश्न विचारले असता जयंत पाटील यांनी उत्तर दिली. महाराष्ट्र अखंड रहावा असं आम्हाला वाटते असंही यावेळी जयंत पाटील बोलले आहेत.
 
विधिमंडळाचा पूर्वइतिहास
 
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला १३८ वर्षांचा प्रदीर्घ व वैभवशाली इतिहास आहे. ब्रिटिश कारकिर्दीत मुंबई इलाखा होता. त्या वेळच्या मुंबई प्रांतामध्ये मराठवाडा व विदर्भाचा भाग वगळून आताच्या महाराष्ट्रासह बेळगाव, कारवार, विजापूर हे भाग, तसेच भारताची फाळणी होण्यापूर्वीचा सिंध प्रांत व सध्याचे गुजरात राज्य यांचा समावेश होता. 
ब्रिटिशाच्या काळातच विधिमंडळे अस्तित्वात आली आणि हळूहळू त्यांचे अधिकार वाढविण्यात आले. या प्रक्रियेची सुरुवात १८६१ सालच्या इंडियन काउन्सिल अ‍ॅक्टने झाली आणि १८६२ साली आठ-दहा सभासदांचे COUNCIL OF THE GOVERNOR OF BOMBAY ASSEMBLED FOR THE PURPOSE OF MAKING LAW AND REGULATIONS  स्थापन झाले व २२ जानेवारी १८६२ रोजी त्यांची पहिली बैठक झाली. त्यानंतर, १८९२ च्या इंडियन काउन्सिल्स अ‍ॅक्ट अन्वये विधिमंडळाचे अधिकार काही प्रमाणात वाढविण्यात आले. प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न विचारणे, अंदाजपत्रकाची चर्चा करणे, असे त्यांचे साधारणत: स्वरूप होते. सध्याच्या कामांच्या तुलनेत त्या कामांची व्याप्ती फारच मर्यादित होती. त्यानंतर, १९०८ साली मोर्ले-मिंटो सुधारणा आल्या आणि १९१९ साली माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा येऊन खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाहीची बिजे रोवली गेली व प्रांताप्रांतात द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. त्यानंतर, १९३५ चा गव्हर्नमेंट आॅफ इंडिया अ‍ॅक्ट अस्तित्वात आला, ज्यात संघराज्यात्मक शासनपद्धती स्वीकारण्यात आली आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टमध्ये कायदे मंडळात लोकप्रतिनिधींना निवडणुकीद्वारे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून खरे म्हणजे निवडणुकांना सुरुवात झाली. त्यामध्ये स्थानिक लोकांना कायदेमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले. या कायद्यान्वयेच तेव्हाच्या मुंबई कायदेमंडळाचे ‘विधानसभा व विधानपरिषद’ असे नामाभिधान होऊन दोन सभागृहे मुंबई प्रांतात जुलै १९३७ मध्ये अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अमलात आली. 
घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार द्वैभाषिक मुंबई राज्य विधानमंडळ व पुढे १ मे १९६० रोजी राज्य पुनर्रचना कायद्यानुसार ‘महाराष्ट्र राज्य’ स्थापन झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विधानमंडळ’ अस्तित्वात आले.
 

Web Title: The House is closed for consideration - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.