महाबळेश्वरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, शोधकार्यात अडथळे वाढणार
By admin | Published: August 4, 2016 08:24 AM2016-08-04T08:24:31+5:302016-08-04T11:00:03+5:30
मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे सावित्री नदीत सुरु असलेल्या शोधकार्याला अजूनही म्हणावी तशी गती मिळू शकलेली नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
महाड, दि. ४ - मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे सावित्री नदीत सुरु असलेल्या शोधकार्याला अजूनही म्हणावी तशी गती मिळू शकलेली नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. रात्री महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. तिथून वाहून येणा-या पाण्यामुळे दुपारी सावित्री नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते.
आणखी वाचा
महाबळेश्वर खो-यात मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथून वाहून येणा-या पाण्यामुळे सावित्री नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. महाबळेश्वरमधला पाऊस कमी झाला तरच शोधकार्याला गती मिळू शकते. महाडमध्येही रात्री पावसाची संततधार सुरु होती. सकाळी पाचवाजल्यापासून पाऊस कमी झाला आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली शोध घेणे शक्य नसल्याने चुंबकाच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे. एक वस्तू चुंबकाला चिकटली असून, क्रेन आणि जाळीच्या मदतीने ही वस्तू बाहेर काढण्यात येईल. पाण्याच्या दाबामुळेच हा जुना जीर्ण झालेला पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली.