VIDEO : महाड दुर्घटना - ८ दिवसांनी सापडले एसटी बसचे सांगाडे
By admin | Published: August 11, 2016 11:05 AM2016-08-11T11:05:21+5:302016-08-11T13:49:32+5:30
मागच्या आठवडयात महाड सावित्रीनदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन एसटी बसचे सांगाडे सापडले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
महाड, दि. ११ - मागच्या आठवडयात महाड-पोलादपूरला जोडणा-या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील दोनपैकी एका एसटी बसचे सांगाडे सापडले आहेत.
दुर्घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी हे सांगाडे शोधण्यात यश मिळाले आहे. दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर हे अवशेष सापडले आहेत. हे सांगाडे बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. शोधकार्य सुरु असताना नौदलाला हे सांगाडे सापडले. सीवित्रीची जलपातळी सध्या कमी झाली आहे. पाण्याचा वेगही कमी आहे.
नौदलाच्या पाणबुड्यांनी आज सकाळी सलग तीन तास पाण्याखाली सर्च ऑपरेशन केले. त्यावेळी एकाच एसटीचा सांगाडा सापडला. सापडलेल्या सांगाड्यात मृतदेह नसल्याची माहिती नौदलाच्या पाणबुड्यांनी दिली. रायगड आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख व निवासी उप जिल्हाधिकारी सतिश बागल यांनी ही माहिती दिली .
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीश कालीन पूल मंगळवारी रात्री दोन ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता झाले होते. त्यातील काही जणांचे मृतदेह सापडले.
पूल कोसळला त्यावेळी दोन एसटी बससह काही छोटी वाहने प्रवाहात वाहून गेली होती. दुर्घटनेनंतर दोन ते तीन दिवस पावसाचा जोर आणि सावित्री नदीची धोकादायक पातळी यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदलाचे नदीच्या वेगवान प्रवाहातही शोधकार्य सुरु होते.