महाड दुर्घटना - महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश
By Admin | Published: August 11, 2016 06:36 PM2016-08-11T18:36:41+5:302016-08-11T18:36:41+5:30
महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
>ऑनलाइन लोकमत
अलिबाग दि.11 :- महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले तालुक्यात मौजे सावर्डे या गावी जावून शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीचे प्रत्येकी 4-4 लाख रुपयांचे धनादेश देऊन सांत्वन केले. या दुर्देवी दुर्घटनेत श्रीकांत कांबळे यांच्या सोबत त्यांचा मुलगा महेंद्र हा देखील मृत पावला असल्याने एकूण 8 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला.
या दुर्घटनेतील 21 मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला असून उर्वरित 5 जणांच्या संदर्भातही वारसाबाबत कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होऊन त्यांच्या वारसांना तातडीने धनादेश दिले जातील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल यांनी दिली.