वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'

By admin | Published: August 19, 2016 12:56 PM2016-08-19T12:56:32+5:302016-08-19T13:00:31+5:30

पोलीस अधीक्षक संदीप पाटील स्वतः चौकशीसाठी गेले असताना संतोष पोळनं त्यांच्याकडे पत्र सोपवलं असून जेरबंद केल्याबद्दल ग्रॅड सॅल्युट केला आहे

Wai massacre: The accused, from Santosh Pol, sent the police 'grand salute' | वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'

वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट'

Next
>- ऑनलाइन लोकमत 
सातारा, दि. 19 - एकापाठोपाठ तब्बल सहाजणांची निर्घृण हत्या करणा-या आरोपी डॉक्टर संतोष पोळला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्याने पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्यांची कबुलीदेखील दिली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी पळवाटा शोधत असतात. मात्र आरोपी संतोष पोळने आपल्याला जेरबंद करणा-या पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. पोलिसांना पत्राद्वारे त्यांने अभिनंदन केलं असून पोलीसदेखील आश्चर्य व्यक्त करत आहेत. 
 
पोलीस अधीक्षक संदीप पाटील स्वतः चौकशीसाठी गेले असताना संतोष पोळनं त्यांच्याकडे हे पत्र सोपवलं.  यामध्ये त्याने पोलीस अधीक्षकांना ग्रॅड सॅल्युट केला आहे. संतोष पोळने लिहिलेल्या पत्रात ' हे सर्व का केलं अस जर तुम्ही विचारलत...तर हा प्रश्न तुमच्याच पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिका-यांना आणि मुर्दाड समाजाला विचारण्याची गरज आहे', असं म्हटलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रमुख विश्वास वेताळ यांनी हा गुन्ह्याचा छडा लावल्याचंही पोळ याने लिहिलं आहे. पोळने पत्रात विश्वास वेताळ यांचं कौतुकही केलं आहे.
 
भ्रष्ट अधिका-यांमुळेच इतरी वर्ष या हत्याकांडांचा तपास लागला नाही असं संतोष पोळचा दावा आहे. संतोष पोळने पत्राच्या माध्यमातून पोलीस खात्यातील भ्रष्ट आणि सुस्त अधिकाऱ्यांना चपराक लगावली आहे. दरम्यान विश्वास नांगरे - पाटील यांनी 2003 पासूनच्या सर्व अधिका-यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते.
संतोष पोळ हा बोगस डॉक्टरच
साताऱ्यातील एका महाविद्यालयातून १९९६ मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्याचे संतोष पोळ हा एकीकडे पोलिसांना सांगत असला तरी ते महाविद्यालय २००६ मध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे त्याने कोणत्याही महाविद्यालयातून डॉक्टरकीची अधिकृत पदवी घेतली नसून, तो बोगस डॉक्टरच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने आतापर्यंत ज्या-ज्या हॉस्पिटलमध्ये काम केले आहे, त्या ठिकाणीही पोलिस संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत
 
‘लोकमत’ने व्यक्त केली होती शक्यता
मंगल जेधे यांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘वाई तालुक्यातून आणखी चार महिला बेपत्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने अजून एक धक्कादायक शक्यता व्यक्त केली होती. ‘या चारजणींच्या बेपत्ता होण्यामागे संतोष पोळच कारणीभूत असावा,’ अशी शक्यताही ‘लोकमत’ने वर्तविल्यानंतर पोलिस यंत्रणाही त्या दृष्टीने अधिक सतर्क झाली होती. 
 
आणखी दोन खड्डे !
संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संतोष पोळने त्याच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे खणल्याचे मंगळवारी पोलिस तपासात उघडकीस आले. त्यामध्ये त्याची प्रेयसी ज्योती मांढरे हिचाही तो खून करणार होता. ‘तुझ्या अंगावर व्रण उठले असून, इजेंक्शन दिल्यानंतर ते निघून जातील,’ असे तो तिला सांगत होता. मात्र, तिचा गेम करण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया कार्यक्रमात दिली. परंतु दुसरा खड्डा त्याने कोणासाठी खणून ठेवला होता, याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.
 
महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण
महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.
 

Web Title: Wai massacre: The accused, from Santosh Pol, sent the police 'grand salute'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.