किबे लक्ष्मी चित्रपटगृहात मराठी चित्रपट दाखवावेत

By Admin | Published: August 24, 2016 10:47 PM2016-08-24T22:47:18+5:302016-08-24T22:47:18+5:30

किबे लक्ष्मी चित्रपटगृह हे पुण्याचे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण व मराठी चित्रपटांचे माहेर असल्याने याठिकाणी फक्त मराठी चित्रपट दाखवले जावेत,'

To show Marathi films in Keebe Lakshmi Cinemas | किबे लक्ष्मी चित्रपटगृहात मराठी चित्रपट दाखवावेत

किबे लक्ष्मी चित्रपटगृहात मराठी चित्रपट दाखवावेत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 -  किबे लक्ष्मी चित्रपटगृह हे पुण्याचे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण व मराठी चित्रपटांचे माहेर असल्याने याठिकाणी फक्त मराठी चित्रपट दाखवले जावेत,' अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना बुधवारी दिले.
मराठी चित्रपटांचे हक्काचे व्यासपीठ मानल्या जाणा-्या पूर्वीच्या प्रभात आणि आत्ताच्या किबे लक्ष्मी चित्रपटगृहात मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची परंपरा असताना या चित्रपटगृहात हिंदी चित्रपटाचे दोन खेळ लावण्यात आल्याने रसिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. याठिकाणी मराठी चित्रपट प्रदर्शित व्हावेत असे कोणतेच बंधन नसल्याने यापुढील काळात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित न झाल्यास हिंदीसह इंग्रजी चित्रपट दाखविण्याचे संकेत थिएटर मालकांनी दिले असल्याचे वृत्त ’लोकमत’ ने प्रसिद्ध केले होते. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळत नसताना किबे लक्ष्मी सारख्या हक्काच्या ठिकाणी मराठी ऐवजी हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याबददल मराठी चित्रपट क्षेत्रातून नाराजीची भावना उमटली.
यापार्श्वभूमीवर महामंडळाने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले.
त्याचा स्वीकार किबे थिएटरचे मालक/व्यवस्थापक सुरेश किबे यांनी केला.'किबे लक्ष्मी चित्रपटगृह पुण्याचे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. मराठी रसिक व निर्मात्यांच्या हदयात स्थान निर्माण केलेले हे 
हक्काचे चित्रपट गृह असून याठिकाणी पूर्वी फक्त मराठी चित्रपट दाखवले जात होते. आपले चित्रपटगृह मराठी निर्मात्यांसाठी माहेरघर असल्यासारखे आहे.
आपले चित्रपटगृह कायमस्वरूपी फक्त मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध राहावे व मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यास हातभार लावावा,' अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली.
मराठी चित्रपटांना थिएटर मिळावेत अशी महामंडळाची भूमिका आहे. किबे
लक्ष्मी मराठीचे माहेर असल्याने इथे हिंदी चित्रपट लावूनयेत अशी मागणी
आम्ही केली आहे.याबरोबरच एकुण सर्वच चित्रपटगृहात मराठी चित्रपटांच्या
शोची संख्या वाढविण्याची गरज आहे. ज्या वेळी 15 - 20 सिनेमे यायचे
त्याचवेळची शो संख्या आजही कायम आहे आज 150 मराठी सिनेमे येतात आणि शो
मात्र 112 हे गणित विसंगत आहे. काही थिएटर मालक एकाच चित्रपटाचे 112 शो
करतात आणि बाकीच्या चित्रपटांना नकार देतात हे चित्र बदलण्याची गरज आहे.
दरम्यान, हिंदी किंवा इतर भाषीक चित्रपट थिएटर मालक 50 टक्के कमिशन
बेसीसवर घेतात, मराठी निर्मात्यांना मात्र भाडे भरावे लागते तर
मल्टेप्लेक्समध्ये फक्त 45 टक्के कमिशन दिले जाते हा मराठीवर अन्याय आहे.
मराठी सिनेमेही 50 टक्केकमिशन बेसीसवर दाखविण्यात यावेत यासाठी सिनेमा
ओनर्स अँड एक्झीबिटर असोशिएशनशी चर्चा करणार असल्याचे राजेभोसले यांनी
सांगितले.
 

Web Title: To show Marathi films in Keebe Lakshmi Cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.