अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है - नितिन गडकरी
By admin | Published: September 13, 2016 04:35 PM2016-09-13T16:35:28+5:302016-09-13T17:09:43+5:30
अच्छे दिनचं स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आता 'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - अच्छे दिनचं स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आता 'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलले आहेत. रोड इन्फ्रास्ट्रक्चर या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नितिन गडकरी यांनी उत्तर दिलं.
'माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीमधील एनआरआय कॉन्फरन्समध्ये एकदा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी लवकरच अच्छे दिन येतील असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी अच्छे दिनची संकल्पना रुढ झाली. आम्ही फक्त त्यातील तो 'अच्छे दिन' हा शब्द वापरला होता. अच्छे दिनचा शब्दश: अर्थ न घेता प्रगती मार्गावर किंवा प्रगतशील असा होतो,' असं स्पष्टीकरण नितिन गडकरी यांनी दिली आहे.
'भारत म्हणजे असंतृष्ट आत्मांचा महासागर आहे. त्यामुळे कोणाचं कधीच समाधान होत नाही. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला गाडी हवी असते त्यामुळे कोणीच संतृष्ट नसतो,' असं नितीन गडकरी बोलले. यावर विजय दर्डा यांनी यामध्ये गैर काय असं विचारलं असता यामुळे अच्छे दिन आले असं कधी कोणालाच वाटत नाही असं नितिन गडकरी बोलले आहेत.
सिमेंट माफियांची पोलखोल -
'भारतामध्ये काहीहा केलं तरी फायदा उचलणा-यांची कमी नसते. सिमेंट कंपन्या कृत्रीमरित्या भाव वाढवतात. संधी दिसली की हे सिमेंटवाले प्रोडक्शन ठरवतात आणि आपला भाव वाढवतात. मी दोन वेळा हात जोडून त्यांना असं न करण्याची विनंती केली. तेव्हा आम्ही असं करत नाही असं म्हणत होते. तेव्हा मी तुमचा बॅण्ड बाजा नाही वाजवला तर माझं नाव बदला असं सांगितलं होतं, आणि मी वाजवला,' असं सांगत नितिन गडकरींनी सिमेंट माफियांची पोलखोल केली.
"The cement industry is no less than a mafia" @nitin_gadkari on difficulties faced by during projects. pic.twitter.com/6ilmuQQAgy
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
'मी इंजिनिअर नाही, कॉमन सेन्सचा वापर करुन काम करतो. कधीकधी तर दहावी शिकलेला माणूसही गेम चेंजर बनू शकतो,' असं नितिन गडकरींनी सांगितल्यावर सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
'मी मलबार हिलला राहत असताना एकदा टीव्ही विकत घेण्यासाठी गेलो असताना दुकानदाराने हफ्त्यावर घेणार का अशी विचारणा केली होती. त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही हफ्त्यावर मिळू शकतो तर मग रस्ते का नाही मिळू शकत. त्यानंतर गुंतवणूकदाराला समाधान मिळावं यासाठी मी धोरणात हलके बदल केले,' अशी आठवण नितीन गडकरींनी सांगितली.
'वसुलीच्या भीतीने बँका आजही राजकारणी आणि वकिलांना क्रेडिट कार्ड देत नाहीत,' अशी हलकी कोपरखळी यावेळी नितिन गडकरींनी मारली.
'निपक्ष: आणि सामंजस्यपणाचे निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणा-यांना समर्थन देत जे अप्रामाणिकपणे निर्णय घेतात त्यांच्याविरोधात कारवाई करणं गरजेचं. अशाच प्रकारे मानसिकता बदलली जाऊ शकते,' असं मत नितिन गडकरींनी व्यक केलं.
Mr. @nitin_gadkari, Hon'ble Union Minister talks about the system and e-governance at the #LokmatInfraConclavepic.twitter.com/pAW8BBZG7C
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) September 13, 2016
'चीनसोबत स्पर्धा करणं कठीण आहे, पण आपणं आपल्या समस्यांचं रुपांतर संधीत करु शकतो. खूप दूरपर्यंत जायचं आहे, प्रयत्न नक्की करणार. ग्रामीण भागांना जोडण्याची संकल्पना माझी नाही, यामागे अटलबिहारी वाजपेयींची दृष्टी, प्रधानमंत्री सडक योजना अनेक वर्ष लक्षात ठेवली जाईल,' असं नितिन गडकरी बोलले आहेत.