मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली

By admin | Published: September 22, 2016 08:01 AM2016-09-22T08:01:04+5:302016-09-22T08:58:17+5:30

मागच्या आठवडयात परतलेल्या पावसाचा जोर मुंबईत कायम असून, संपूर्ण रात्रभर मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले.

Due to heavy rains, water, roads and local traffic stagnant in low-lying areas in Mumbai | मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली

मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागात साचले पाणी, रस्ते-लोकल वाहतूक मंदावली

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - मागच्या आठवडयात परतलेल्या पावसाचा जोर मुंबईत कायम असून, संपूर्ण रात्रभर मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. पहाटेही पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. परळच्या हिंदमातासह मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. 
 
मुंबईसह उपनगरातही पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. वांद्रे, अंधेरी आणि गोरगाव तसेच ठाणे आणि नवी मुंबईतही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. 
 
धुवाधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. आणखी काही तास असाच पाऊस सुरु राहिला तर, मुंबईच्या वाहतूकीला ब्रेक लागू शकतो. सकाळच्या समयी पावसाचा जोर वाढल्याने कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाला. 
 

Web Title: Due to heavy rains, water, roads and local traffic stagnant in low-lying areas in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.