राज्यात रासपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यात हाणामारी, पुतळ्यांची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 02:59 PM2016-10-12T14:59:24+5:302016-10-12T14:59:24+5:30
रासपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रासपाच्या महादेव जाणकरांचा पुतळा जाळत आहेत.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर तीन ते चार तरुणांकडून शाईफेक करण्यात आली आहे. शाईपेक करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे आणि रासपचे कार्यकर्ते जनवाडी पोलीस स्टेशनसमोर एकमेकांमध्ये भिडले. काल दसरा मेळाव्यात भगवानगडावर महादेव जाणकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी तर्फे निशेध केला जात आहे. रासपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पुतळे जाळत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रासपाच्या महादेव जाणकरांचा पुतळा जाळत आहेत. रासपा-राष्ट्रवादी हा राजकीय वाद सध्या लोकांध्ये आणि राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय जाला आहे.
दरम्यान, शाई फेकणा-या तरुणांना इतर विद्यार्थ्यांनी अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. शाई फेकणा-या चौघा तरुणांना जनवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे हॉस्टेल शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे आहे.
भगवानगडावर काल (मंगळवारी) महादेव जानकारांनी बारामती उद्धवस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रासापा कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.
राष्ट्रवादीकडून सातारा येथे भगवानगडावरील जाणकरांच्या वकत्वव्याच्या निशेधार्थ रस्ता रोको अंदोलन केले, त्यावेली त्यांनी जाणकरांचा पुतळा जाळला. तर जालन्यात रासपा कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांचा पुतळा जाळला. पुणे येथे रासपाप्रमुख महादेव जानकर यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी यावेळी त्यांच्याकडून निशेध व्यक्त केला जात आहे.
लोणावळ्यात शहर व नाणे मावळ राष्ट्रवादीच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे शिवाजी महाराज पुतळा चौकात दहन करण्यात आले. अपशब्द वापरल्याचा यावेळी निषेध करत त्यांच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालत त्याला जोडे मारण्यात आले.