VIDEO : मोठ्या नोटा रद्द झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प, नागरिक त्रस्त

By Admin | Published: November 9, 2016 11:23 AM2016-11-09T11:23:33+5:302016-11-09T11:49:05+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. ९ - पाचशे व हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेमुळे देशभरात ...

VIDEO: Due to the cancellation of big notes, daily business jam, civilians stricken | VIDEO : मोठ्या नोटा रद्द झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प, नागरिक त्रस्त

VIDEO : मोठ्या नोटा रद्द झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प, नागरिक त्रस्त

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - पाचशे व हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेमुळे देशभरात संभ्रमाचे वातावरण आहे. काल रात्रीपासूनच ५०० व १०००च्या नोटा रद्द झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुट्टे पैसे नसल्यामुळे अनकेांना व्यवहार करता येत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
काल रात्रीपासून अमनेक एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज बँका व एटीएम सेंटर्स बंद असल्याने हातात पैसे असतानाही केवळ सुट्टे नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकात टिकीट काऊंटरवर लांबच लांब रांगा असून छोट्या अंतराच्या टिकीटासाठीही प्रवासी ५०० व १०००च्या नोटा देत आहेत. मात्र त्यांना परत देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने बुकींग ऑफीसर त्यांना तिकीटे देण्यास नकार देत आहेत.
दरम्यान मुंबईतील मेट्रो स्थानकातही पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने  गोंधळाचे वातावरण असून प्रवाशांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर गिऱ्हाईकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी घट झाल्याने क्रॉफर्ड मार्केटमधील बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुट्टे पैसे नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. 
दरम्यान ठाण्यात पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारल्या जात असल्याने तीन पेट्रोल पंप येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून ट्रॅफिक जाम झाले आहे. 
 

 

https://www.dailymotion.com/video/x844h9y

Web Title: VIDEO: Due to the cancellation of big notes, daily business jam, civilians stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.