राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘जल्लीकट्टू’ला समर्थन

By Admin | Published: January 14, 2017 02:53 PM2017-01-14T14:53:18+5:302017-01-14T15:00:29+5:30

तामिळनाडूत पोंगल सणानिमित्त खेळण्यात येणा-या ‘जल्लीकट्टू’ खेळाच्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील उडी घेतली खेळाचे समर्तन केले आहे.

RSS support for Jallikattu | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘जल्लीकट्टू’ला समर्थन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘जल्लीकट्टू’ला समर्थन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ -  तामिळनाडूत पोंगल सणानिमित्त खेळण्यात येणा-या ‘जल्लीकट्टू’ खेळाच्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील उडी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी लावली असली तरी संघाने या खेळाचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे. ‘जल्लीकट्टू’ हा केवळ एक खेळ नसून देशाच्या समृद्ध परंपरेचे एक प्रतिक असल्याचा दावा, संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख जे.नंदकुमार यांनी केला आआहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘जलीकट्टू’वर बंदी घातल्याने केंद्र सरकारने वटहुकूम काढून त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तामिळनाडू सरकार व सर्व राजकीय पक्षांनी केली होती. मात्र केंद्राने वटहुकूम काढण्यास नकार दिला आहे. दरम्यान पोंगल व संक्रांतीच्या निमित्ताने प्राण्यांशी संबंधित होणाºया खेळांवर बंदी कायम आहे. शुक्रवारी तामिळनाडूत तरुणांच्या एका गटाने बैलांना काबूत करण्याच्या या खेळाचे आयोजनदेखील केले होते.
या मुद्द्यावरुन तामिळनाडूतील राजकारण तापले असताना संघाने त्याचे समर्थनच केले आहे. ‘जलीकट्टू’ हा खेळ देशाच्या समृद्ध परंपरेचे एक प्रतिक आहे. देशाची अर्थव्यवस्था ही कृषीआधारित आहे. देशाच्या संस्कृतीतील वैभवशाली परंपरा व नागरिकांचे दुर्दम्य शौर्य त्यातून झळकते, अशी प्रतिक्रिया जे.नंदकुमार यांनी दिली आहे.

Web Title: RSS support for Jallikattu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.