बंडखोरीच्या भीतीपोटी युतीची चर्चा सेनेने थांबवली?

By admin | Published: January 20, 2017 01:45 PM2017-01-20T13:45:26+5:302017-01-20T13:52:53+5:30

'शिवसेनेने आपले म्हणणे मांडले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घ्यावी', असे सांगत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबली असल्याचे संकेत दिले आहेत.

Fear of rebellion stopped the army's alliance? | बंडखोरीच्या भीतीपोटी युतीची चर्चा सेनेने थांबवली?

बंडखोरीच्या भीतीपोटी युतीची चर्चा सेनेने थांबवली?

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही शिवसेना आणि भाजपा या दोस्तांमधली कुस्ती काही थांबवण्याचे नाव घेत नाही. 'शिवसेनेने आपले म्हणणे मांडले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घ्यावी', असे सांगत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी युतीची चर्चा थांबली असल्याचे संकेत दिले आहेत.
 
एकीकडे भाजपाचे नेते शिवसेनेवर आरोप करत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री युतीची भाषा करत आहेत.  भाजपाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये करणे थांबवावी, असे सांगत पक्षप्रमुखांवर आरोप होत असतील तर खपवून घेणार नाही, असा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.  
दरम्यान, बंडखोरीच्या भीतीमुळे शिवसेनेने भाजपासोबतच्या युतीची चर्चा थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  त्यामुळे आज युतीबाबत चर्चा करायची नाही, असा निर्णय शिवसेनेने घेतल्याचेही समजत आहे.
 

Web Title: Fear of rebellion stopped the army's alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.