युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा
By admin | Published: January 23, 2017 04:19 PM2017-01-23T16:19:23+5:302017-01-23T19:37:34+5:30
मुंबई महापिलेकतील युतीवरुन शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा सुरुच आहे.
ऑनालाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिकेतील युतीवरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून शिवसेनेने वचननामा जाहीर केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू असे म्हणत पुन्हा एकदा युतीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
भाजपाचा शिवसेनेकडे 114 जागांचा प्रस्ताव गेला आहे. मात्र शिवसेनेकडून आम्हाला कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. आम्ही सकारात्मक प्रस्तावाची वाट पाहत आहे. आम्ही युती करण्याच्या बाजूने आहे जिथे होईल तिथे युती करणार, असे मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं.
वेगळे लढलो तर निवडणुकीच्या नंतर कोणाची मदत घेण्याचा प्रश्नच नाही, कारण भाजपाला तशी गरजच भासणार नाही. तसेच मुंबई महापालिकेतील उमेदवारांच्या जागा आणि अजेंडा याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. युती व्हावी याबाबतची शंका निर्माण व्हावी अशी शिवसेनेची गेल्या काही दिवसातली कार्यपद्धती आहे, असे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.