भाजपा पांडव, शिवसेना कौरव - आशिष शेलारांचे टीकास्त्र
By admin | Published: January 28, 2017 06:53 PM2017-01-28T18:53:15+5:302017-01-28T21:39:33+5:30
केवळ अहंकारामुळे महाभारत घडलं होतं, त्याच अहंकारामुळे युती तुटली असे सांगत आशीष शेलार यांनी 'भाजपा पांडव तर शिवसेना कौरव' अशी टीका केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - ' ज्या अहंकारामुळे महाभारत घडलं होतं, त्याच अहंकारामुळे युती तुटली ' असे सांगत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी 'भाजपा पांडव तर शिवसेना कौरव' अशी घणाघाती टीका केली आहे. मुंबईतील भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी युती तुटीचे खापर शिवेसेनवर फोडत ' उद्धव ठाकरेंना दुर्योधनाची तर सेनेला कौरवांची ' उपमा दिली.
शेलारांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे
- अहंकारामुळे युती तुटली, महाभारताचा दाखला देत मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांची शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका.
- आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची दुर्योधनाशी तर शिवसेनेची कौरवांशी केली तुलना
- ढेकूण, बैल यासारखी भाषा अहंकारी रावणासारखी.
- भाजपासोबत पांडवसेना आहे, त्यामुळे कौरवांचा पराभव होणार
- मुख्यमंत्री म्हणतात सत्ता हे साध्य नाही, साधन आहे.
- मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी केला.
- शिवसेनेच्या वचननाम्यात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेखही केलेला नाही
- बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणा-या दादरमधील नेत्यासोबत (राज ठाकरे) हे (शिवसेना) युती करणार असल्यामुळेच वचननाम्यात स्मारकाचा उल्लेख टाळला का? - आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका.