नाशिक : शस्त्रबंदी भंगप्रकरणी ६ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: February 4, 2017 01:24 PM2017-02-04T13:24:16+5:302017-02-04T13:43:06+5:30

अजय बोरस्ते आणि विनायक पांडे यांच्यादरम्यान झालेल्या वादाप्रकरणी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांविरोधात शस्त्रबंदी कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

Nashik: 6 civilians have been booked for violation of the Arms Act | नाशिक : शस्त्रबंदी भंगप्रकरणी ६ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : शस्त्रबंदी भंगप्रकरणी ६ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ४ - अजय बोरस्ते आणि विनायक पांडे यांच्यादरम्यान झालेल्या वादाप्रकरणी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांविरोधात शस्त्रबंदी कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि वहिनीला तिकीट मिळावं यासाठी माजी महापौर विनायक पांडे यांनी काल शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्तेंना मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. 
काल नाशिकमधील एस.एस.के हॉटेलमध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करत होते. दुपारी १२ च्या सुमारास  शिवसेना नेते आणि माजी महापौर विनायक पांडे तिथं दाखल झाले आणि त्यांनी मुलगा व पत्नीसाठी तिकीट मागितले. मात्र एकाच घरात किती तिकीटे देणार ? असा प्रश्न विचारत बोरस्तेंनी पांडे यांना तिकीट देण्यास नकार दिला. त्यामुळे पांडेंच्या चिडलेल्या समर्थकांनी बोरस्तेंना मारहाण केल्याचे वृत्त आहे. 
विशेष म्हणजे तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या पांडेंनी थेट भाजपा कार्यालय गाठलं. तिथे हजर असलेल्या गिरीश महाजन यांनी तत्काळ पांडे यांचा मुलगा ऋतुराज आणि पांडे  यांची पत्नी कल्पना पांडेंचं स्वागत केलं. आणि  ऋतुराज पांडेला वॉर्ड क्रमांत 13 मधून तर कल्पना पांडे यांना वॉर्ड क्रमांक 24 मधून उमेदवारी देण्यात आली.  
 

Web Title: Nashik: 6 civilians have been booked for violation of the Arms Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.