नो वन किल्ड सतीश शेट्टी, सीबीआयने सादर केला क्लोजर रिपोर्ट

By admin | Published: August 11, 2014 02:13 PM2014-08-11T14:13:01+5:302014-08-11T14:51:26+5:30

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या करणारा मारेकरी सापडत नसल्याने सीबीआयने ही केस बंद करण्याची शिफारस करणारे पत्र वडगाव मावळ कोर्टासमोर सादर केले आहे.

No One Killed Satish Shetty, Closure Report submitted by the CBI | नो वन किल्ड सतीश शेट्टी, सीबीआयने सादर केला क्लोजर रिपोर्ट

नो वन किल्ड सतीश शेट्टी, सीबीआयने सादर केला क्लोजर रिपोर्ट

Next

ऑनलाइन टीम

पुणे, दि. ११ - पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या करणारा मारेकरी  सापडत नसल्याने सीबीआयने ही केस बंद करण्याची शिफारस करणारे पत्र वडगाव मावळ कोर्टासमोर सादर केले आहे. 
चार वर्षांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव येथे भरवस्तीत हत्या झाली होती. शेट्टी यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक व्यावसायिकांचे जमिनीबाबतचे गैरव्यवहार उघड केले होते. यातूनच सतीश शेट्टी यांची हत्या झाल्याचा संशय होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत शेट्टी यांच्या भावाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. मात्र तब्बल चार वर्षानंतरही सीबीआयला सतीश शेट्टी यांच्या हत्येची उकल करण्यात यश आलेले नाही. सोमवारी सीबीआयने वडगाव मावळ कोर्टासमोर क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यामुळे शेट्टी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. 

Web Title: No One Killed Satish Shetty, Closure Report submitted by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.