बर्थ-डे पार्टीत नाचायला नकार देणा-या मित्राची हत्या

By Admin | Published: February 15, 2017 09:10 AM2017-02-15T09:10:13+5:302017-02-15T11:37:39+5:30

केवळ नाचायला नकार दिला त्यामुळे एक मित्रच मित्राच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The murder of a friend who refuses to dance at the Birthday Party | बर्थ-डे पार्टीत नाचायला नकार देणा-या मित्राची हत्या

बर्थ-डे पार्टीत नाचायला नकार देणा-या मित्राची हत्या

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बर्थ-डे पार्टीत केवळ नाचायला नकार दिला त्यामुळे एक मित्रच मित्राच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी परिसरात हा गंभीर प्रकार घडला आहे. मित्राचाच जीव घेतल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी केतन शिरोडकरला (वय 24 वर्ष) ताब्यात घेतले आहे. केतननं स्वतःचाच मित्र अंकुश जाधवची हत्या केली. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा केतन दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमध्ये राहणारा अंकुश जाधव हा अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील लॉटरी सेंटरमध्ये कामाला होता. सोमवारी रात्री, अंकुश आणि केतन ग्रुपमधल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी दारू पार्टी केली आणि मोबाइलवर गाणी लावून नाचू लागले.
 
अंकुश नाचत नसल्याने सर्वजण त्याला नाचण्यासाठी जबरदस्ती करत होते, पण तरीही अंकुश काही जागचा हलला नाही. दरम्यान, या सर्वांमध्ये केतननं दारूचे अति सेवन केले होते. त्यामुळे दारूच्या नशेत त्यानं अंकुशसोबत वाद घालायला सुरुवात केली. सर्वजण बोलावत असताना का नाचायला येत नाही, यावरुन केतन अंकुशसोबत भांडू लागला. 
 
यानंतर केतनने तिथेच असलेल्या काठीने अंकुशला मारझोड करायला सुरुवात केली. मारहाणीमुळे अंकुश बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. यानंतर त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते, अशी माहिती पोलीस अधिकारी बाळासाहेब साळुंखे यांनी दिली. पोस्टमार्टेम अहवालानुसार पोलिसांनी केतन शिरोडकरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. 

Web Title: The murder of a friend who refuses to dance at the Birthday Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.