राजाला टाळी न दिल्याने दादू बहुमतापासून वंचित
By admin | Published: February 25, 2017 09:04 AM2017-02-25T09:04:40+5:302017-02-25T09:15:27+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला असला तरी, मुंबईकरांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना नंबर 1 पक्ष ठरला असला तरी, मुंबईकरांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला बहुमताचा स्पष्ट कौल दिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत स्वबळावर महापौर बसवण्यासाठी शिवसेनेला तडजोड करावी लागेल किंवा पुन्हा भाजपासोबत जावे लागेल.
भाजपबरोबर युती तोडल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी केली असती तर, आज मुंबई महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले असते तसेच मनसेचा आकडा देखील वीसच्या पुढे गेला असता. काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या.तिथे सेनेचे उमेदवार काहीशे मतांच्या फरकाने पडले. हीच मते मनसे उमेदवारांनी घेतली.
मुंबईत 30 ते 35 जागांवर मनसे उमेदवारांची मते निर्णायक ठरली. ज्यांचा फटका शिवसेनेला बसला. 2009 लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी लाखांच्या वर घेतलेल्या मतांमुळे शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला होता. आता काहीशे मतांमुळे शिवसेनेला पालिकेत बहुमतापासून वंचित रहावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता. पण शिवसेनेने त्याकडे दुर्लक्ष केले. ज्याचा फटका शिवसेनेला बसला आहे.