देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 07:37 AM2017-03-02T07:37:41+5:302017-03-02T07:39:42+5:30

मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही

The idea of ​​'patriotism' as the story of 'elephant and seven blind' in the country - Uddhav Thackeray | देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

देशात सध्या ‘हत्ती व सात आंधळे’ कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - देशद्रोहाची व्याख्या अशी सोयीनुसार बदलता येणार नाही. अफझल गुरूच्या समर्थनाचे नारे देणे हा देशद्रोह ठरत असेल तर सैनिकांच्या पत्नींचा अत्यंत खालच्या स्तरावर अवमान करणाऱ्या भाजप आमदाराचा गुन्हा निदान भयंकर अपराध तरी ठरू द्या. मतांच्या फुगलेल्या आकड्यांवर देशभक्तीच्या व्याख्या ठरू लागल्या तर देशाचा कठीण काळ यायला सुरुवात झाली असे  समजायला हरकत नाही! देशभक्तीचे मुखवटे घातकच आहेत अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. 
 
लोकशाही म्हणजे काय याबाबत आपल्या देशात आजही तसे गोंधळाचेच वातावरण आहे, त्याच पद्धतीने ‘देशभक्ती’ म्हणजे नक्की काय, याचीही व्याख्या आपल्याकडे ठरत नाही. ‘हत्ती व सात आंधळे’ या कथेप्रमाणे ‘देशभक्ती’ची कल्पना जो तो आपल्या पद्धतीने करताना दिसत आहे.  देशभक्तीचा मक्ता कुणा एकाच व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे असता कामा नये. म्हणजे अमूक व्यक्तीने अमूक केले म्हणजेच तो देशभक्त आणि तमूक केले तर देशद्रोही असा जबरदस्तीचा कारभार उपयोगाचा नाही. उदाहरणच द्यायचे तर गांधीहत्या हे पातकच आहे. पण नथुराम गोडसे देशभक्त नव्हताच किंवा तो देशद्रोही होता हे ठरवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मुळात स्वतंत्र हिंदुस्थानात राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी ‘देशभक्ती’चा जो घोळ घालून ठेवला आहे तो चिंताजनकच आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ‘जेएनयू’चा नेता कन्हैया हा पक्का देशद्रोही आहे, पण महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांतजी परिचारकसाहेब हे मात्र देशद्रोही नाहीत. सैनिक व त्यांच्या कुटुंबाचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार भयंकर असला तरी सरकार किंवा पक्षातर्फे यावर कोणीच साध्या निषेधाचे भाष्य केलेले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पडलेल्या ठिणगीचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षाने रान पेटवले होते.
 
कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनांविरोधात भाजपची विद्यार्थी परिषद असा हा जोरदार सामना तेव्हा गाजला. पण याच ‘अभाविप’ने प्रशांत परिचारक यांच्या अश्लील शेरेबाजीविरुद्ध उलटा पवित्रा घेतला. परिचारक यांचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी गटांना धमक्या देऊन फलक लावले व त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. हे सत्य असेल तर कन्हैयाविरोधाचा लढा भंपक होता असेच म्हणावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
‘नोटाबंदी’स विरोध करणारे भ्रष्ट किंवा देशविरोधी आहेत हे सरकारी म्हणणे आहे, पण नोटाबंदीनंतरही सीमेवरील जवानांचे बलिदान थांबलेले नाही व सरकार अपयशी ठरले आहे हे कोणत्या देशभक्तीचे लक्षण मानायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Web Title: The idea of ​​'patriotism' as the story of 'elephant and seven blind' in the country - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.