हॅकर्सचं लक्ष्य आता व्हॉट्सअॅप, मुंबईतील महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक

By admin | Published: March 2, 2017 01:57 PM2017-03-02T13:57:33+5:302017-03-02T14:08:45+5:30

फेसबूक आणि ई-मेल नंतर हॅकर्सनी आता व्हॉट्सअॅपला लक्ष्य केलं आहे. मुंबईच्या परेलमध्ये राहणा-या एका 30 वर्षीय महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक

Hackers' goal is now WhatsApp, Women's WhoseSupa Hack in Mumbai | हॅकर्सचं लक्ष्य आता व्हॉट्सअॅप, मुंबईतील महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक

हॅकर्सचं लक्ष्य आता व्हॉट्सअॅप, मुंबईतील महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - फेसबूक आणि ई-मेल नंतर हॅकर्सनी आता व्हॉट्सअॅपला लक्ष्य केलं आहे. मुंबईच्या परेलमध्ये राहणा-या एका 30 वर्षीय महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची तक्रार तिने काळाचौकी पोलिसांकडे केली आहे.  हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.  
 
या वृत्तानुसार, नेहा जैन या महिलेनं 13 फेब्रुवारीला व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची तक्रार  केली.  तिचं फेसबूक अकाउंटही हॅक झालं आहे. हॅकरने नेहाचं अकाउंट हॅक करून  तिच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून पैशांची मागणी केली. मला पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे माझ्या पेटीएम अकाउंटमध्ये लवकरात लवकर 5000 रुपये टाका असा मेसेज हॅकरनं महिलेच्या मित्रांना टाकला.
8 फेब्रुवारीला नेहाच्या एका मैत्रिणीने तू पैसे का मागत आहेस हे विचारण्यासाठी फोन केला असता सर्व प्रकार नेहाच्या लक्षात आला. त्यानंतर लिंक पाठवणा-या नंबरवर तिने कॉल केला असता मला कोणतेही पोलीस पकडू शकत नाही अशी धमकी हॅकरने तिला दिली. सध्या सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे. 
 
कसं हॅक झालं व्हॉट्सअॅप-
हॅकरने नेहाच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला त्यामध्ये एक लिंक होती. अनोळखी नंबरवरून मेसेज आला म्हणून महिलेनं मेसेज कोणी पाठवला हे पाहण्यासाठी त्या नंबरचा प्रोफाइल फोटो बघितला तर तो फोटो तिच्या जवळच्या व्यक्तीचा होता. त्यामुळे तिने ती लिंक कॉपी-पेस्ट करुन मेसेजला उत्तर दिलं आणि नंतर तिचं फेसबूक आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं.
 
 
 

Web Title: Hackers' goal is now WhatsApp, Women's WhoseSupa Hack in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.