पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स

By Admin | Published: March 19, 2017 11:52 AM2017-03-19T11:52:11+5:302017-03-19T11:52:11+5:30

आजकाल प्रत्येक सोशल मीडिया वापरणार्‍या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो

8 Simple Tips for Safeguarding Your Password | पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स

पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 -  आजकाल प्रत्येक सोशल मीडिया वापरणार्‍या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे. आठवण्यास सोपा असलेला पासवर्ड वापरण्यास सोपा असतो, पण आर्थिक देवाणघेवाण जेथे होते त्या वेबसाईटवर असे सोपे पासवर्ड वापरणे सुरक्षित नसते. पासवर्ड चोरीला जाण्याचा जागा वेगवेगळ्या असू शकतात. काही व्हायरस मध्ये कीलॉगर हा सोफ्टवेअर वापरलेला असतो. 
 
तसेच जर कोणाला तुमचे पासवर्ड चोरायचे असेल तर अशा व्यक्ती, तुम्ही वापरीत असलेल्या सार्वजनिक संगणकावर हा सोफ्टवेअर वापरून तुमचा पासवर्ड चोरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक संगणकावर इंटरनेट वापरताना अधिक काळजी घ्यावी. आपण यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजू शकतो. व प्रत्येक उपायाचा परिणाम हा भिन्न भिन्न असतो. सुरक्षित पासवर्ड बनवणे हा उपाय तुम्हाला इंटरनेट वर ह्याक होणाऱ्या पासवर्ड चोरीपासून वाचवू शकतो. जाणून घ्या पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स 
 
तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
 
पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@789
 
कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
 
पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
 
कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
 
आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा
 
डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त असते. जसे की - Ne@r (Near) वगैरे.
 
तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.
 

Web Title: 8 Simple Tips for Safeguarding Your Password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.