सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

By admin | Published: August 12, 2014 01:41 AM2014-08-12T01:41:52+5:302014-08-12T01:41:52+5:30

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरण बंद करावे, असा प्रस्ताव सीबीआयच्या पुणे विभागाने मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात सोमवारी दुपारी दाखल केला.

CBI closes report in case of Satish Shetty murder case | सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

सतीश शेट्टी खून प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

Next

पिंपरी-चिंचवड : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरण बंद करावे, असा प्रस्ताव सीबीआयच्या पुणे विभागाने मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात सोमवारी दुपारी दाखल केला. गेली साडेचार वर्र्षे सुरू असलेल्या या खून प्रकरणातील आरोपीपर्यंत सीबीआयला पोहोचता आले नाही, यावरून माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील सतीश भोजा शेट्टी (३९) यांनी माहिती अधिकार कायद्याच्या मध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. त्यांची १३ जानेवारी २०१० रोजी भंडारी हॉस्पिटल समोर अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने ३ महिने याचा तपास केल्यानंतर हे प्रकरण जुलै २०१०मध्ये सीबीआय आकुर्डी पुणे येथे वर्ग केले. सोमवारी दुपारी वडगाव न्यायालयाचे न्यायाधीश महिपाल बिहारे यांच्या समोर या प्रकरणात आरोपी सिद्ध होत नसल्याने प्रकरण बंद करण्याचा प्रस्ताव सादर झाला. हे प्रकरण वडगाव न्यायालयातून पुणे सत्र न्यायालयात जाऊन निर्णय होणार आहे.
रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी व आयआरबी कंपनीचे मालक यांचे संबंध असल्याने तपासावर दबाब आणल्यानेच सीबीआय प्रकरण बंद करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केला गेला. आरोपींना पकडून शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढाई लढणार आहे, असे शेट्टी यांचे भाऊ संदीप म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: CBI closes report in case of Satish Shetty murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.