VIDEO - आयुष्यातलं पहिलं ट्विट सुषमा स्वराजांमुळे यशस्वी झालं - डॉ लकडावाला

By admin | Published: April 11, 2017 08:10 PM2017-04-11T20:10:51+5:302017-04-11T23:13:19+5:30

जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने आयुष्यातील पहिलं ट्विट केलं आणि ते केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे यशस्वी झालं

VIDEO - The first tweet of life succeeded by Sushma Swaraj - Dr. Lakdawala | VIDEO - आयुष्यातलं पहिलं ट्विट सुषमा स्वराजांमुळे यशस्वी झालं - डॉ लकडावाला

VIDEO - आयुष्यातलं पहिलं ट्विट सुषमा स्वराजांमुळे यशस्वी झालं - डॉ लकडावाला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने आयुष्यातील पहिलं ट्विट केलं आणि ते केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यामुळे यशस्वी झालं असं प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितलं आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. मुफ्फझल लकडावाला यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसंबंधी घटनाक्रम उलगडला.
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे. 
 
लोकमत समूहाचे एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्याकडून तुम्हाला या महिलेची माहिती कशी मिळाली याबाबत उत्सुकता असल्याचं विचारलं असता डॉ लकडावाला यांनी सांगितलं की, "तिच्या बहिणीने आपल्याशी संपर्क साधला होता. तिचा फोटो आणि व्हिडीओ पाहून आपल्याला दया आली, आणि आपण मदत करण्याचा निर्णय घेतला". मात्र इमानला इजिप्तपासून ते मुंबईत आणण्यापर्यंतची प्रोसेस खूपच त्रासदायी होती असंही ते बोलले आहेत. 
 
"इमानच्या निमित्ताने प्रथमच मी प्रथमच ट्विट केलं आणि सुषमा स्वराज यांच्यामुळे ते यशस्वी झालं. इजिप्तवरुन इमानला भारतात आणण्यासाठी 83 लाखाला विमाना बूक केलं होतं. तसंच इमानला घराबाहेर काढण्यासाठी खिडकी तोडावी लागल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. इमानला रुग्णालयात नेणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारची खूप मदत मिळाल्याचं", डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितलं. 
यावेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर माहिती देत असताना सुरुवातील 500 किलो वजन असणा-या इमानचं वजन 262 किलो झालं असल्याची माहिती दिली. 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com
 
 

Web Title: VIDEO - The first tweet of life succeeded by Sushma Swaraj - Dr. Lakdawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.