VIDEO - ...तर आठवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी

By admin | Published: April 11, 2017 09:09 PM2017-04-11T21:09:04+5:302017-04-11T23:15:58+5:30

मला दिल्लीत बोलावून घेतले तर मी महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून रामदास आठवलेंच्या नावाची शिफारस करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO - ... then Athavale is the Chief Minister of Maharashtra | VIDEO - ...तर आठवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी

VIDEO - ...तर आठवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला  दिल्लीत बोलावून घेतले तर मी महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून रामदास आठवलेंच्या नावाची शिफारस करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रामदास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. 
आज संध्याकाळी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये रंगलेल्या  लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रामदास आठवलेंनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत उपस्थितांसाठी पर्वणीच ठरली. आठवलेंचे मिश्किल  प्रश्न आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या तितक्याच मार्मिक उत्तरांमुळे ही मुलाखत उत्तरोत्तर रंगली. रामदार आठवले मुलाखत घेण्यास सज्ज झाल्यावर मला 12वीच्या परीक्षेवेळीदेखील एवढे टेंशन आले नव्हते. असे उदगार काढले. युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.   या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात येत आहे.  
नायक चित्रपटात अनिल कपूर यांनी अम्बरिश पुरी यांची मुलाखत घेतल्यावर अम्बरिश पुरी यांनी त्यांना एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवले होते. आता तुम्ही मला किती दिवसांचे मुख्यमंत्री करणार असे विचारत पहिल्याच प्रश्नाने फडणवीसांसमोर गुगली टाकली. त्यावर तुम्ही एका दिवसासाठी नाही तर अनेक दिवसांचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा असल्याचे सांगत फडणवीसांनी खणखणीत चौकार ठोकला. 
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
 

facebook.com/lokmat
 
अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, शरद पवार आणि रामदास आठवले या चार नेत्यांपैकी  अटलजींची निरागसता, निस्पृहता, नरेंद्र मोदींचे कार्यक्षमता आणि दृढता, शरद पवारांचा चाणाक्षपणा आणि रामदास आठवलेंची काव्यबुद्धी आपल्याला आवडते असे फडणवीसांना एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच उद्धव ठाकरे आणि आपल्यात वैयक्तिक मैत्री आहे. कधी कधी मतभेद होतात, पण ते सोडवायला आठवले आहेत, असेही फडणवीस यांनी आठवलेंनी युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.   
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान झालेला विरोध, विरोधकांची संघर्षयात्रा यांना धरून फडणवीसांना सत्तेचे काटे टोचू लागलेत का, असा सवालही आठवलेंनी केला. त्यावर फार काही भाष्य न करता फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर बोलणे टाळले. 

आठवलेंच्या शीघ्रकवितांनी आणली मुलाखतीत रंगत
रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीदरम्यान अनेक शीघ्रकविता ऐकवून कार्यक्रमात हशा पिकवला.  

- ज्या वर्तमानपत्राची आहे महाराष्टात पत 
 त्या वृत्तपत्राचे नाव आहे लोकमत!

- पाहली बार ले रहा हूँ सीएम का interview,
 ये इव्हेंट का हे अच्छा view!

-मोदी आणि फडनवीसचे कराल मजबूत हात
तर जेवढी पाहिजे तेवढी देईन साथ

आठवलेंच्या या कवितांना फडणवीस यांनीही कवितेतून उत्तर दिले. 
- तुम्हीच आहेत श्रेष्ठ कवी सर्वांचं एकमत
इथे आहे लोक आणि साथीला लोकमत  
 
 
आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि  वैद्यकीय यामधील 14   पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देईऊ गौरवण्यात येत आहेत . त्यात देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. 
 
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
 

lmoty.lokmat.com
 
 
 

Web Title: VIDEO - ... then Athavale is the Chief Minister of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.