राणेसाहेबांच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडेल-बिघडेल - नितेश राणे

By Admin | Published: April 13, 2017 10:47 AM2017-04-13T10:47:27+5:302017-04-13T10:49:42+5:30

"राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचे आयुष्य घडणार आणि बिघडणारही आहे. मात्र, राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल," असं विधान आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

After Rane's decision many lives will be lost - Nitesh Rane | राणेसाहेबांच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडेल-बिघडेल - नितेश राणे

राणेसाहेबांच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडेल-बिघडेल - नितेश राणे

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

कणकवली, दि. 13 - "राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचे आयुष्य घडणार आणि बिघडणारही आहे. मात्र, राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल," असं विधान आमदार नितेश राणे यांनी केले आहे. बुधवारी कणकवलीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. 
 
एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी असे वक्तव्य केल्यानं राजकीय गोटात राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. 
"महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे नावाची भीती किती आहे. हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. राणेसाहेबांच्या भोवतालीच महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे. साहेब कुठे जाणार? कोणता निर्णय घेणार? याची चिंता आम्हाला सोडून सर्वांनाच आहे. राणेसाहेबांच्या निर्णयानंतर खूप जणांचे आयुष्य घडणार आणि बिघडणारही आहे. मात्र, राणेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हा कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल", असे नितेश राणे म्हणालेत. 
 
(अहमदाबादमध्ये नारायण राणेंची हजेरी, दुसरीकडे फडणवीस आणि अमित शहांची बैठक)
तर दुसरीकडे भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये बैठक झाली. याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त येत आहे. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं आहे.
"एबीपी माझा"ने दिलेल्या वृत्तानुसार नारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी कोणतीही चर्चा न करता अहमदाबादमधून रवाना झाले आहेत. नारायण राणे दुस-या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. 
 
(भारत-पाक नेहमीच शत्रू म्हणून राहू शकत नाही - पाक NSA)
नारायण राणे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी भेट झाली का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, नारायण राणे अहमदाबादेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अमित शहा यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने रवाना झाले होते. बैठकीतील माहिती समोर येत नसली तरी या बैठकीमुळे राज्यातील राजकीय उकाडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
भेट झालीच नाही - मुख्यमंत्री
दरम्यान, नारायण राणे अहमदाबादेत मला किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांना भेटलेच नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 
 

Web Title: After Rane's decision many lives will be lost - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.