डिजीधन योजनेत लातूरच्या तरुणीला मिळालं कोटीचं बक्षीस
By admin | Published: April 14, 2017 03:11 PM2017-04-14T15:11:33+5:302017-04-14T15:11:33+5:30
डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे आज नागपुरातील डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणाऱ्या भाग्यवान विजेत्यांची नावे आज नागपुरातील डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.
लातूरची श्रद्धा मंगेश ही तरुणी भाग्यवान विजेती ठरली असून तिला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रद्धाने केवळ 1490 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. आणि ती डिजीधन योजनेची भाग्यवान विजेती ठरली.
तर व्यापारी श्रेणीत रा.जी. राधाकृष्णन यांना 50 लाख रुपयांचं दुसरं तर रागिनी उपदेकर यांना 25 लाख रुपयांचं तिस-या क्रमांकाचं बक्षीस देण्यात आले. ग्राहक श्रेणीत चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाख रुपयांचे दुसरे आणि भरत सिंह (देहरादून) यांना 25 लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले.
नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने देशात डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना सुरू केल्या होत्या. यासाठी 10 एप्रिलला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात बक्षीसांची सोडत काढण्यात आली. पण त्यावेळी विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली नव्हती. ही नावं आज नागपुरात पंतप्रधानांची उपस्थित असलेल्या डिजीधन मेळाव्याच्या कार्यक्रमात जाहीर करुन विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली.